शरद पवार जाणते राजे नाही, तर मुघल शहेनशाह…भाजपचा पवारांवर पलटवार

दिल्ली, १२ सप्टेंबर २०२२ : राष्ट्रवादी काँग्रेसचे आठवे राष्ट्रीय संमेलन दिल्लीत नुकतेच ताला कटोरा मैदानात पार पडले. या संमेलनाच्या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आगमनाला कार्यकर्त्यांनी जोधा-अकबर या बॉलीवूड चित्रपटातील अजीम ओ शान शहेनशहा हे गाणं लावलं होतं. याच गाण्यावरून भाजपने शरद पवार यांच्यावर ट्विट करत टीका केली आहे.

पवार साहेबांची दिल्लीत शहेनशहा हीच खरी ओळख आहे. अशा शब्दात भाजपने ट्विटर वरून पवारांवर निशाणा साधला आहे. तसेच हा व्हिडिओ भाजपने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर दोन्ही पक्षाकडून आरोप प्रत्यारोप करण्यात आले.

दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांना आमचा पक्ष कधीही शरण जाणार नाही. तसेच केंद्रातून भाजप सरकारला सत्तेतून खाली आणण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन शरद पवार यांनी राष्ट्रीय संमेलनात बोलताना केले होते. राष्ट्रीय संमेलनावेळी पवारांचे व्यासपीठावर आगमन होत असताना उत्साही कार्यकर्त्यांनी अज़ीम-ओ-शान शहेनशहा हे गाणं लावलं. अज़ीम-ओ-शान शहेनशहा हे गाणं सम्राट अकबराचे गुणगान सांगण्यासाठी आहे. हा मुद्दा पकडून भाजपने टीका केली आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनीही ट्वीट करुन राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. दिल्लीच्या अधिवेशनात अझीम ओ शान शहेनशाह हे गाणं वाजवलं. आम्ही तेच म्हणत होतो. हे जाणते राजे नसून मुघल शहेनशाहच आहेत. कोणते? ते आपल्याला माहितीच आहे असं ट्वीट करत भातखळकरांनी पवारांना टोला लगावला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी ही न संपणारी लढाई असून आता पुढचे आरोप कोण कोणावर करणार हे पहाणं औत्सुक्याचं आहे.

न्यूज प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा