शेती नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार मराठवाड्याच्या दौर्‍यावर

बारामती, १७ ऑक्टोबर २०२०: काही दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. अलीकडच्या ३ दिवसात तर पावसानं चांगलच झोडपून काढलं आहे. या दरम्यान शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. कांदा, पालेभाज्या आणि इतर धान्य पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मराठवाड्याचा दोन दिवसीय दौरा करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार १८ ते १९ ऑक्टोबर या दोन दिवसांत मराठवाड्यात असतील. मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि लातूर या भागांचा दौरा करणार आहेत. ते तुळजापूर, उमरगा,औसा, परंडा ,उस्मानाबादमधील भागांना भेटी देतील, यावेळी ते अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतील अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली.

शरद पवार यांच्या मराठवाडा दौऱ्यानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वी शरद पवार यांनी निसर्ग चक्रीवादळानंतर कोकण दौरा केला होता. पवार यांनी तेथील परिस्थितीची आढावा बैठक घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. यानंतर राज्य सरकारकडून नुकसान भरपाईसंबंधी निर्णय घेण्यात आले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा