अहमदनगर, 3 ऑक्टोंबर 2021: भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जवळीक पुन्हा एकदा वाढताना दिसते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याची प्रशंसा केली.
पवार म्हणाले की, नितीन गडकरींनी पावरचा वापर कसा होतो ते सांगितलं. ते पुढं म्हणाले की, गडकरींच्या प्रकल्पात काम दिसत आहे.
अहमदनगरमधील एका महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित होते. शरद पवार कार्यक्रमात म्हणाले, ‘मी या कार्यक्रमात आलो कारण मला सांगण्यात आलं की नितीन गडकरी अहमदनगरमधील अनेक प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. यामुळं शहरातील अनेक समस्या सुटतील आणि मी या कार्यक्रमात उपस्थित राहावं अशी त्यांची इच्छा होती.
गडकरी लोकप्रतिनिधी कसं काम करतात याचं उत्तम उदाहरण
शरद पवार म्हणाले की, अनेक वेळा असं होतं की एखाद्या प्रकल्पाची पायाभरणी केली जाते, पण जेव्हा गडकरींच्या प्रकल्पाचा प्रश्न येतो तेव्हा काही दिवसांतच काम पूर्ण झाल्यासारखं वाटतं. नितीन गडकरी हे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी कसं काम करू शकतात याचं उत्तम उदाहरण आहे.
गडकरींनी अप्रतिम काम कसं केलं याचं उदाहरण देऊन स्पष्ट केलं.
शरद पवार पुढं म्हणाले, ‘मला आठवतं की, गडकरींनी मंत्रीपदाची सूत्रं हाती घेण्यापूर्वी सुमारे 5,000 किमीचं काम केलं होतं. पण त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर हा आकडा 12,000 किलोमीटरच्या पुढं गेला. आपल्या संबोधनादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील रस्तेबांधणी प्रकल्पादरम्यान भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्थानिक नद्यांचीही काळजी घेतली.
नितीन गडकरी जॉन केनेडी यांच्या ओळींची पुनरावृत्ती
यानंतर, चांगल्या रस्त्यांचं महत्त्व सांगताना नितीन गडकरी म्हणाले की, देशाच्या विकासासाठी 4 गोष्टी आवश्यक आहेत. त्या चार गोष्टींमध्ये रस्त्यांसह पाणी, वीज आणि दळणवळण यांचा समावेश आहे. गडकरी पुढं म्हणाले की, राज्यात मंत्री असताना, त्यावेळी माझे सचिव तांबे साहेबांनी मला अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन केनेडी यांनी सांगितलेली गोष्ट सांगितली. ते वाक्य होते ‘अमेरिका श्रीमंत आहे, त्यामुळं अमेरिकेचे रस्ते चांगले नाहीत. अमेरिकेत चांगले रस्ते आहेत, त्यामुळे अमेरिका श्रीमंत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे