गोल पोस्ट इतर पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शरद पवारांचे जोरदार स्वागत

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शरद पवारांचे जोरदार स्वागत

पुणे, १९ मे २०२३: पुणे जिल्हा नियोजन समितीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी हजेरी लावली आहे. त्यांचे सर्वांनी मिळून स्वागत केले. या बैठकीसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे उपस्थित आहे.

आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील शेळके, आमदार दत्तात्रय भरणे, आमदार सुनील कांबळे, शिंदे गटाचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे, भाजपचे नेते माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यासह अधिकारी उपस्थित आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राज्यसभा खासदार शरद पवार यांनी अनेक वर्षांनंतर हजेरी लावली आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्याच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदार संघात नेलेल्या विकास निधीला विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कात्री लावली होती. त्यानंतर निधी कपातीवरुन चर्चेचे गुराळ सुरू झाले होते. त्यामुळे आजच्या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version