मुंबई, 4 ऑक्टोंबर 2021: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीच्या टिकुनिया भागात घडलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणाला वेग आला आहे. शेतकऱ्यांशी झालेल्या हिंसक संघर्षात एकूण 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये चार शेतकरी आणि चार भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या घटनेनंतर परिसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री आशिष मिश्रा यांच्या मुलाने शेतकऱ्यांवर गाडी चढवली, असा आरोप आहे.
या घटनेचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. काँग्रेस पाठोपाठ आता अन्य विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर या घटनेवरून जोरदार टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी देखील या घटेनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.
”आमच्या शेतकऱ्यांचा आवज दाबण्याची क्रूर पद्धत. मी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी मध्ये घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करतो. असं शरद पवार यांनी ट्विट केलं आहे. तसेच, #लखीमपुर खीरी नरसंहार असा हॅशटॅग देखील त्यांनी ट्विटसोबत जोडलेला आहे.
दुसरीकडे भारतीय किसान युनियनने दावा केला आहे की, या हिंसाचारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. शेतकरी राकेश टिकैत यांनी म्हटलं की, शेतकरी परतत असताना वाहनांनी त्यांच्यावर हा हल्ला केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे