शरद पवार यांची कोरोना टेस्ट, रिपोर्ट आला…

मुंबई, १७ ऑगस्ट २०२०: कोरोनाने राज्यात धुमाकूळ घातला असून राजकिय क्षेत्रात देखील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात मागेच नवनीत राणा यांची प्रकृती कोरोनामुळे ढासाळली होती. तर त्यांना आईसीयू वाॅर्डात दाखल करण्यात आले होते. या व्हायरसने मुख्यमंत्र्यांच्या बंगलावर देखील धडक दिली होती.तर आता राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांच्या बंगल्यावर देखील कोरोनाने धडक दिली आहे.

सिल्वर ओक बंगल्यावरील दोन कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे आध्यक्ष शरद पवारांचा हा बंगला आहे. तसेच हे दोन कर्मचारी शरद पवार यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक असल्याचे कळते आहे. तसेच शरद पवार हे या कर्मचा-यांच्या संपर्कात नव्हते. मात्र आता सिल्वर ओक वरील सर्व कर्मचारी आणि शरद पवारांचे पीए यांची चाचणी करण्यात आली आहे ज्या मध्ये सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. रॅपिड टेस्ट मध्ये या दोन्ही कर्मचा-यांची कोरोना टेस्ट हि पाॅजिटिव्ह आली आहे.

या पार्श्वभूमवीर शरद पवार यांची देखील कोरोना चाचणी ब्रीज कैंडी रुग्णालयात झाली असून त्यात शरद पवरांचा रिपोर्ट हा नेगेटिव्ह आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा