शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार ब्रीच क्रँडी रूग्णालयात दाखल

मुंबई, १४ जुलै २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असून मुंबईमधील ब्रीच क्रँडी रूग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडणार आहे. शरद पवारही रूग्णालयात दाखल झाल्याची माहिती समजते.

प्रतिभा पवार यांच्यावर कोणती शस्त्रक्रिया होणार आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एक महिन्या पूर्वी शरद पवार यांनी पहिल्यांदा राष्ट्रावादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते तेव्हा शरद पवारांसोबत कार्यक्रमाला प्रतिभा पवारही उपस्थित होत्या. मात्र त्यानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली.

यावेळी अजित पवारांची निवड न झाल्याने ते नाराज होते आणि त्यांनी बंड करत राष्ट्रवादीच्या आमदारांचा एक गट सोबत घेत शिंदे-फडणवीसांसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मुंबईमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते त्यावळी सर्वाधिक आमदार अजित पवारांसोबत असल्याचे दिसून आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा