गोल पोस्ट क्रीडा शारापोवाला वाइल्ड कार्डव्दारे स्पर्धेत प्रवेश

शारापोवाला वाइल्ड कार्डव्दारे स्पर्धेत प्रवेश

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध टेनिसपटू मारिया शारापोवाला आॅस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत वाइल्ड कार्डव्दारे प्रवेश देण्यात आला आहे. ही स्पर्धा २० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२० या कालावधीत होणार आहे.
२००८ मध्ये मारियाने आॅस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस ही स्पर्धा जिंकली होती. नुकत्याच झालेल्या ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शारापोवाचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले होते.
शारपोवाची जागतिक क्रमवारीत १४७ व्या स्थानावर घसरण झाली आहे. मागील वर्षी दुखापतीमुळं त्रस्त असलेल्या शारापोवाला या स्पर्धेव्दारे आपली कारकिर्द सुधारण्याची संधी मिळणार आहे. आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सहभागी होण्याची शारापोवाची ही १६ वी वेळ आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version