गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा जॉन आणि आदित्य “व्हिलन २” साठी एकत्र

जॉन आणि आदित्य “व्हिलन २” साठी एकत्र

मुंबई : अभिनेता जॉन अब्राहम आणि आदित्य रॉय कपूर ‘व्हिलेन २’ या चित्रपटामध्ये एकत्र झळकणार असल्याची माहिती मिळत आहे.
जॉन आणि आदित्य ‘व्हिलेन २’ या चित्रपटामध्ये एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरी तर निर्मिती एकता कपूर आणि भूषण कुमार करणार आहेत.
‘व्हिलेन २’ हा चित्रपट याआधीच्या मोहित सूरी दिग्दर्शित ‘एक व्हिलेन’ या चित्रपटाचा सिक्‍वेल नसून हा पूर्णतः वेगळ्या थाटणीचा चित्रपट असेल असे सांगण्यात आले आहे.
मोहितने जॉन आणि आदित्य यांना चित्रपटाची कथा ऐकवली असून दोघांनीही चित्रपटासाठी होकार दिल्याचे समजते आहे. दरम्यान, जॉनच्या ‘सत्यमेव जयते २’ आणि ‘मुंबई सागा’ या चित्रटांची सध्या प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version