पुणे, दि. ४ जून २०२०: भारत आणि चीन सीमा विवादानंतर भारतामध्ये चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सुरूवात झाली आहे. ‘बॉयकॉट चायना प्रॉडक्ट’ असा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर जोर धरत आहे. टिक टॉक, यूसी ब्राउजर यांच्यासारखे अनेक ॲप लोकांनी काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. परंतु यासाठी पर्याय देखील भारतामध्ये असणे गरजेचे आहे.
अँड्रॉइड फोन म्हटलं की सर्वात महत्त्वाचे म्हणजे फाईल ट्रान्सफर करणे. मोठ्या फाइल्स जसे की व्हिडिओ, चित्रपट, फोटो, गाणे दुसऱ्या अँड्रॉइड स्मार्टफोनवर किंवा आय एस ओ स्मार्टफोनवर पाठवण्याचे झाले तर शेअर इट हा आतापर्यंत सर्वात जास्त वापरला जाणारा पर्याय होता. परंतु आता चीनी ॲप बॉयकॉट केल्यानंतर याला देखील एक पर्याय हवाच.
गुगल प्ले स्टोअर वर यासाठी एक पर्यायी ॲप आहे ते म्हणजे ‘जिओस्विच’. जिओस्विच हे ॲप रिलायन्स रिटेल लिमिटेड या कंपनीने तयार केलेले आहे. प्ले स्टोअर वर हे ॲप २०१६ पासूनच उपलब्ध आहे. परंतु आता चिनी ॲप ला पर्याय म्हणून भारतामध्ये हे मोठ्या प्रमाणावर डाउनलोड केले जात आहे. आतापर्यंत हे ॲप ५० लाख वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.
या ॲप मध्ये जाहिरातींचे प्रमाण खूप कमी आहे. तसेच शेअर इट प्रमाणे जास्त प्रमाणात एक्सेस परमिशनची गरज देखील नाही. त्यामुळे वापरण्यासाठी देखील सुरक्षित आहे. या ॲपची साइज ५.६४ एमम्बी आहे. हे ॲप बिना इंटरनेट चालणारे आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी