शरीरसुखाची मागणी करणाऱ्या पत्नीला पतीने चोपले

अहमदाबाद: पत्नीने नवऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याने नवऱ्याने तिला चांगला चोप दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुजरातमधील अहमदाबादमध्ये घडली आहे. आपण संसारातून संन्यास घेतला असल्याचे सांगत पत्नीची शारीरिक सुखाची मागणी नवऱ्याने धुडकावून लावली. शारीरिक सुखाची मागणी केल्यामुळे नवऱ्याने आपल्याला बेदम चोपल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

ही बाब जेव्हा पत्नीच्या घरच्यांना समजली तेव्हा त्यांनी नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या नवऱ्याविरोधात आणि त्याच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिलेचे लग्न १४ मे २०१६ साली सरखेज भागात राहणाऱ्या तरुणाशी झालं होतं. सुरुवातीला सगळं व्यवस्थित चाललं होतं. पहिलं मूल झाल्यानंतर गोष्टी बिघडायला सुरुवात झाली. नवरा शारीरिक सुख देत नव्हता. जेव्हा बायकोने त्याच्याकडे या सुखाची मागणी केली तेव्हा त्याने भडकून तिला मारायला सुरुवात केली. पीडितेने केलेल्या तक्रारीत म्हटलंय की, तिच्या नवऱ्याने संन्यास घेतल्याचा दावा केला आहे. एकदा पीडितेने नवऱ्यावर शारीरिक सुखासाठी दबाव टाकला. यावेळी नवरा घर सोडून गेला. त्याच्या घरच्यांना त्याने घर सोडण्याचे कारण समजले तेव्हा त्यांनी या महिलेला चोपले असे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा