गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई शार्पशूटर सुनील गायकवाडला अटक

शार्पशूटर सुनील गायकवाडला अटक

मुंबई, १० ऑक्टोबर २०२०: चित्रपट दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेला आणि सध्या पॅरोलवर असताना फरार झालेला शार्पशूटर सुनील गायकवाड याला ठाण्याच्या कळवा भागातून पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांनी ही माहिती दिली.

गायकवाड याच्यावर हत्या तसंच हत्येच्या प्रयत्नांचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यानं २००० साली राकेश रोशन यांच्यावर सांताक्रूझ इथं त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडल्या होत्या.

अनेक हत्या प्रकरणांवरून जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या गायकवाडला जून महिन्यात २८ दिवसांच्या पॅरोलवर सोडल्यापासून तो फरार होता. मात्र, काल मिळालेल्या खबरीवरून त्याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version