गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट शास्त्रींसोबत तणावाचे संबंध नाहीत : गांगुली

शास्त्रींसोबत तणावाचे संबंध नाहीत : गांगुली

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी, प्रशिक्षक रवी शास्त्रींसोबत तणावाचे संबंध नसून या निव्वळ अफवा आहेत, असे स्पष्ट केले आहे.
याबाबत गांगुली म्हणाले, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत मतभेद असल्याचे वृत्त ही निव्वळ अफवा आहे.
तुमची कामगिरी खराब झाल्यास अन्य खेळाडू जागा घेतील. मी खेळत असतानाही हाच नियम होता.
अफवा ऐकायला मिळती आणि गौप्यस्फोटही होत राहतील पण लक्ष मात्र २२ यार्डदरम्यान असायला हवे. दरम्यान, गांगुली आणि शास्त्री यांच्यातील मतभेदांच्या चर्चांना गांगुलीने पूर्णविराम दिला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version