गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा तुरुंगातून मिळालेल्या पैशांचा संजय दत्तने ‘असा’ केला उपयोग

तुरुंगातून मिळालेल्या पैशांचा संजय दत्तने ‘असा’ केला उपयोग

मुंबई : ६ डिसेंबरला पानिपत हा चित्रपट प्रदर्शित झाला. यातील अहमदशहा अब्दालीची भूमिका अभिनेता संजय दत्तने निभावली आहे. या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संजय दत्तने ‘कपिल शर्मा शो’ मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने तो तुरुंगात असताना तुरुंगात केलेल्या कामातून मिळालेल्या पैशाचे काय केले याचा खुलासा केला आहे.
हे पैसे मी एका खास कारणासाठी कमवत होतो. मला रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला ओवाळणी टाकता यावी यासाठी माझे प्रयत्न सुरु होते. मी कागदी पिशव्या तयार करुन जे पैसे कमविले ते रक्षाबंधनला माझ्या बहिणीला दिले. दरम्यान संजय दत्त हा अवैधपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. शिक्षा पूर्ण झाल्यावर त्याला सोडून देण्यात आले होते.

error: Content is protected !!
Exit mobile version