गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा कियारा अडवाणी बॉलिवूडमध्ये येण्याआधी करायची ‘हे’ काम

कियारा अडवाणी बॉलिवूडमध्ये येण्याआधी करायची ‘हे’ काम

मुंबई : ‘कबीर सिंग’ या चित्रपटातून यशस्वीरीत्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री कियारा अडवाणीची लोकप्रियता दिवसेंदिवस शिगेला पोहोचत आहे.
कियाराने ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी काय काम करायची याविषयी खुलासा केला आहे.
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी माझी पहिली नोकरी मी आईच्या स्कूलमध्ये केली होती. तिथे मी सकाळी ७ वाजता जात असे आणि लहान मुलांची देखभाल करत असे.
मी लहान मुलांना सांभाळायची सर्व काम केली आहेत. मी नर्सरीमध्ये कविता म्हणत असे, त्यांना अल्फाबेट्स आणि नंबर्स शिकवत असे.
मला लहान मुले फार आवडतात. मी एक दिवस आई होईन माझे बाळ असेल आणि हे जीवनातले सर्वात सुंदर क्षण असतात.
दरम्यान, कियाराने कबीर सिंग मध्ये साकारलेली प्रीतीची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. तिचा आगामी चित्रपट ‘गुड न्यूज’ हा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version