सोलापूर जिल्हा युवक उपाध्यक्षपदी शत्रुघ्न भोसले यांची निवड

सोलापूर, दि. ३ जुलै २०२० : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बेंबळे येथील शत्रुघ्न भोसले यांची छावा क्षात्रवीर सेनेच्या सोलापूर जिल्हा युवक उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

बंडी शेगाव येथे छावा क्षात्रवीर सेनेने बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये बेंबळे तालुका माढा येथील शत्रुघ्न दत्तात्रय भोसले यांची छावा क्षात्रवीर युवक संघटना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा युवक उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी छावा क्षात्रवीर सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष समाधान दादा सुरवसे तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष गणेश नाना चव्हाण, युवक उपाध्यक्ष नौशाद भाई शिकलकर, प्रदेशाध्यक्ष विजय कदम अनिल वावरे तसेच वैभव दादा कांबळे व तालुक्याचे व जिल्ह्याचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

त्यांच्या निवडीबद्दल बेंबळे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच किशोर कदम उपसरपंच एकनाथ दगडू भोसले पार्टी प्रमुख समाधान भागवत भोसले संजय आबा पवार रवी किरण भोसले व ग्रामस्थांनी सर्व स्तरातून त्यांच्या निवडीबद्दल कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. तसेच पंचायत समिती कुर्डूवाडीचे विद्यमान सभापती विक्रम दादा शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा