शेतकरी आत्महत्येमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर

पुणे : राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (NCRB) देशातील शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे.
आकडेवारीनुसार तब्बल १० हजार ३४९ शेतकऱ्यांनी २०१८ या एकाच वर्षात आत्महत्या केली. त्यापेक्षा धक्कादायक म्हणजे सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या आहेत.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांसह विविध आत्महत्यांचा गेल्या वर्षात हा आकडा १७ हजार ९७२ वर पोहोचला आहे. यामध्ये ३५९४ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे गेल्या वर्षात बिहारसारख्या राज्यात एकाही शेतकरी किंवा शेतमजुराने आत्महत्या केल्याची नोंद नाही.
पश्चिम बंगाल, बिहार, ओदिशा, उत्तराखंड, मेघालय, गोवा, चंदीगड, दमन आणि दीव, दिल्ली, लक्षद्विप आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये २०१८ मध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही.

आत्महत्या आकडेवारी
महाराष्ट्र :१७.९७२
तामिळनाडू : १३,८९६
पश्चिम बंगाल : १३२५५

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा