शेतकऱ्याने बी बियाणे खरेदी करताना दुकानदारांकडून बिल घ्यावे : कृषी विभाग

10

नांदेड, दि.२७ मे २०२० : खरीप हंगामासाठी खते, बि-बियाणे, कीटकनाशके खरेदी केल्यानंतर संबंधित दुकानदाराकडून संपूर्ण विवरणासह बिल पावती घ्यावी, असे आवाहन धर्माबाद येथील तालुका कृषि अधिकारी माधुरी उदावंत व पंचायत समितीचे कृषी अधिकारी विश्वास अधापूरे यांनी केले आहे.

शेतकरी कष्टाने शेती पिकवत असतो. अशावेळी खते,  बि-बियाणे, कीटकनाशके व मशागत आदी कामांसाठी त्याला आर्थिक गुंतवणूकही करावी लागते. त्यामुळे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

त्यादृष्टीने गुणवत्ता व चांगल्या दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, भेसळीची शंका दूर करण्यासाठी लेबल असलेले बियाणे खरेदी करावे, पिशवीवर नमूद एमआरपी दरापेक्षा जास्त दराने खरेदी करू नये.

खरेदी केलेल्या बियाण्याचे पीक, वाण, लॉट नंबर, वजन,  बियाणे ज्या कंपनीचे आहे ते नाव, किमान किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, विक्रेत्याचे नाव व सही असलेली रोख अथवा उधारीची पावती घ्यावी. अडचण आल्यास कृषी विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा