पवारांच्या स्पष्टीकरणानंतर शेट्टींची प्रतिक्रिया, ‘आमदारकीचं जाऊद्या, पूरग्रस्तांच्या मदतीवर पवारांनी बोलावं,

कोल्हापूर, ५ सप्टेंबर २०२१: गेल्या काही महिन्यांपासून विधान परिषदेत नियुक्ती करण्यासाठी देण्यात आलेल्या १२ आमदारांच्या यादीबाबत अद्यापही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे प्रलंबित आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजभवनावर जाऊन भेट घेतली. यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नावावरून संभ्रम निर्माण झाला आहे.  राजू शेट्टी यांनीही आक्रमक भूमिका मांडत राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिलाय. शेट्टी नाराज असल्याबाबत पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारला, तेव्हा पवारांनी त्या यादीत शेट्टी यांचं नाव असल्याचं पवारांनी म्हटलंय.
शरद पवारांच्या प्रतिक्रिये नंतर पुन्हा राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त करत म्हणाले की, राजू शेट्टी यांच्या आमदारकीचं जाऊद्या, पूरग्रस्तांना मदत होणार की नाही यावर शरद पवारांनी बोलावं असं. त्यामुळे शेट्टींची नाराजी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. यापूर्वीही शेट्टी यांनी आपली नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीवर टीका केली होती. त्यानंतर काल पहिल्यांदाच शरद पवारांनी आपले मौन सोडत यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर शेट्टी यांनी पुन्हा एकदा रश्टवडिवर घणाघात केलाय.
काय म्हणाले होते शरद पवार
शरद पवार म्हणाले, “राजू शेट्टी नाराज असतील त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जी यादी राज्यपालांना उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. त्यामध्ये राजू शेट्टी यांनी सहकाराच्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिलं आहे. ते लक्षात घेऊन त्यांना विधानपरिषदेवर घ्यावं, राज्यपालांकडे असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्या संबंधीचा अंतिम निर्णय हा राज्यपालांकडून आलेला नाही. त्यामुळे एकदा आम्ही हा निर्णय घेतल्यानंतर, या निर्णयाबाबतची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना, मला आश्चर्य वाटतं की अशाप्रकारची विधानं कशी केली जातात? किंवा आणखी काय, काय… पण आम्ही आमचं काम प्रामाणिकपणाने केलेलं आहे. राजू शेट्टींना काय वक्तव्य करायचं असेल, तर मला त्यावर भाष्य करायचं नाही. पण मी दिलेला शब्द हा पाळलेला आहे. आता राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहतो आहोत.”
राजु शेट्टी- ‘पूरग्रस्तांच्या मदतीवर पवारांनी बोलावं’
पवारांच्या स्पष्टीकरणाबाबत राजू शेट्टी यांना पत्रकारांकडून सांगण्यात आलं. तेव्हा आमदार व्हायचं की नाही हा मुद्दा महत्वाचा नाही. पूरग्रस्तांना मदत होणार की नाही यावर शरद पवारांनी बोलावं, असं शेट्टी म्हणाले. पूरग्रस्तांना राज्य सरकारनं मदत जाहीर केली. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही.
शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी पंचगंगा परिक्रमा सुरु केलीय. १ सप्टेंबरला सकाळी प्रयाग चिखलीपासून ही पंचगंगा परिक्रमा सुरू झाली. त्यांनी प्रयाग संगमावरील दत्ता मंदिरात आल्यावर अभिषेक केला. त्यानंतर यात्रेला सुरुवात झाली. पाच दिवस चालणाऱ्या या परिक्रमेचा नरसोबाच्या वाडीत समारोप होणार आहे. त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी राजू शेट्टी पूरग्रस्तांसह जलसमाधीही घेणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा