गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा शेवाळवाडी फाटा व फुरसुंगी फाटा येथे सिग्नल व्यवस्था सुरू

शेवाळवाडी फाटा व फुरसुंगी फाटा येथे सिग्नल व्यवस्था सुरू

मांजरी : पुणे सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शेवाळवाडी फाटा व फुरसुंगी फाटा येथे सरपंच शिवराज घुले व ग्रामपंचायत च्या माध्यमातून सिंग्नल व्यवस्था करण्यात आली. तसेच कृषी उत्पन्न उपबाजार समिती मांजरी हि हायवेलगत असल्यामुळे येथे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन व दोन्ही सिंग्नलवर वाहतूक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी अशी विनंती मांजरी गावचे सरपंच शिवराज घुले, सदस्य प्रमोद कोद्रे व मान्यवरांनी वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त वाकुंडे यांच्याकडे केली.

मांजरी गावच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध असणारे मांजरी गावचे सरपंच शिवराज घुले यांच्या माध्यमातून अनेक विकास कामाचा आलेख वाढतच आहे. त्यामुळेच विकास कामावर भर देणाऱ्या जनसेवक शिवराज घुले यांच्या पाठिशी नागरिक खंबीरपणे उभे राहतात अशी चर्चा रहिवाश्यांमध्ये रंगत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version