गोल पोस्ट स्पॉटलाइट सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे शिल्पा शेट्टी कडून स्वागत

सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे शिल्पा शेट्टी कडून स्वागत

मुंबई, १९ ऑगस्ट २०२०: अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा यांनी बुधवारी अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले अाहे त्यासंदर्भातले ट्विट करताना तीने लिहले की, “या निर्णयाबद्दल सुप्रीमकोर्टचे कौतुक”…… शिल्पा शेट्टी कुंद्रा 

शिल्पाने पुढे असेही सांगितले की, चौकशीतून लवकरच सत्य बाहेर येईल अशी आशा आहे. एसएसआर मृत्यू प्रकरणातील सीबीआय चौकशीचा निर्णय हि चांगली बातमी असून लवकरात लवकर तपासातून निर्णय यावा, हीच सर्वांची अपेक्षा आहे.

१४ जून रोजी मुंबईच्या वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये मृत सापडलेल्या सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूबद्दल (सीबीआय) चौकशी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिले. हा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांनी केलेल्या याचिकेवर हा आदेश देण्यात आला आहे. सुशांतच्या मृत्यूच्या संदर्भात तिच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला असून तिच्यावर पटना येथे गुन्हा दाखल केला असल्याचे सुशांतसिंग राजपूत याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version