मुंबई, २० जुलै २०२१: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. राज कु्ंद्राला क्राईम ब्रान्चने चौकशीसाठी बोलवले होते. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आले आहे. पॉर्न रॅकेटप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. सात ते आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कुंद्राला अटक केली. अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.
राज कुंद्राच्या अटकेविषयी माहिती देताना मुंबई पोलिस आयुक्तांनी म्हटले आहे की ‘या पॉर्नग्राफिक फिल्मच्या रॅकेटचा तो मुख्य सूत्रधार असल्याची माहिती येते आहे. पॉर्न फिल्म्सची निर्मिती करून या फिल्म्स काही मोबाईल अॅप्सवर प्रदर्शित केल्या जात असल्याचं प्रकरण काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणलं होतं. याप्रकरणात पोलिसांनी एका अभिनेत्रीलाही अटक केली होती. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.
‘फेब्रुवारी २०२१ मध्ये मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅचकडे एक तक्रार नोंदवण्यात आली होती. ही तक्रार पॉर्नोग्राफिक फिल्म्सची निर्मिती करण्याचा आणि त्या काही अॅपच्या माध्यमातून प्रदर्शित करत असल्यासंदर्भातील ही तक्रार होती. आम्ही राज कुंद्राला या प्रकरणात १९ जुलै २०२१ला अटक केली आहे. तो या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे दिसून येते आहे. आमच्याकडे यासंदर्भातील पुरेसा पुरावा आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे,’ अशी माहिती मुंबई पोलिस आयुक्तांकडून देण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे