शिंदे सरकारचा नवा डाव; अजित पवार, जितेंद्र आव्हाडानंतर आदित्य ठाकरे वर निशाणा

मुंबई, १६ सप्टेंबर २०२२ : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता संघर्ष होऊन शिंदे यांनी शिवसेनेचे असंख्य आमदार फोडत शिवसेनेसोबत बंड करून मुख्यमंत्री झाले. ठाकरे आणि महाविकास आघाडीला पहिला दणका दिला, त्यानंतर शिवसेना आमचीच असा दावा करत त्यांनी हे धकातंत्र सुरूच ठेवले. आता अजित पवार जितेंद्र आव्हाड यां महाविकास आघाडीचे सरकार असताना घेतलेला निर्णय रद्द करत आता शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.

नुकतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांनी गृहनिर्माण मंत्री असताना महाडा संदर्भातले सर्व शासनमान्य प्रकल्प निर्णय रद्द केले आहे. तसेच गृहनिर्माण विभागाशी संबंधित सगळे निर्णय म्हाडा आणि विभागीय मंडळाला निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांनी सत्तेत असताना घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देणार असल्याची चर्चा चालू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पर्यावरण विभागाचा आढावा घेतला जात असून, यादरम्यान शिंदे सरकार आदित्य ठाकरेंना ही धक्का देण्याची शक्यता आहे, तसेच पर्यावरण विभागातील अनेक कामांना स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना आदित्य ठाकरे यांनी अनेक कामांचे टेंडर मंजूर करून घेतले होते. पण ते सर्व टेंडर आता रद्द करण्याची तयारी शिंदे सरकारने दाखवली आहे.

तर दुसरीकडे फडणवीस शिंदे सरकारने अजित पवारांनाही मोठा धक्का दिला आहे बारामती मध्ये बिबट्या सफारी प्रकल्प उभारण्याचा निर्णय पवारांनी घेतला होता. पण त्या प्रकल्पाला चांगलाच विरोध होत होता. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी हा प्रकल्प बारामती ऐवजी जुन्नर मध्ये उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा