शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला अपघात

पुणे, ७ जानेवारी २०२३ : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा मुलगा आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला काल रात्री अकराच्या सुमारास पोलादपूरजवळ कशेडी घाटात चोळई हद्दीत अपघात झाला.

सुदैवाने आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. त्यांच्या चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता, कशेडी घाटात पोलादपूर चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यात वाहनाचे नुकसान झाले आहे. आमदार योगेश कदम सुखरूप आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय नेत्यांबाबत अपघाताचे सत्र सुरू आहे. ‘राष्ट्रवादी’चे नेते धनंजय मुंडे यांच्या वाहनाला परळीत येथे अपघात झाला होता. या अपघातामध्ये मुंडे किरकोळ जखमी झाले आहेत. परळीतील आझाद चौकात रात्रीच्या वेळी ही घटना घडली होती. रात्री सुमारे पावणे तीनवाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला होता. यावेळी धनंजय मुंडे स्वतः गाडी चालवीत होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा