सिंधुदुर्गात भाजपचे नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेना मैदानात

नारायण राणे यांचे धाकटे पुत्र नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच एका छोटेखानी कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना भाजपने कणकवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलीय. मात्र आता नितेश राणेंच्या विरोधात शिवसेनेनं उमेदवार दिला आहे.

“शिवसेना कणकवलीतला उमेदवार मागे घेत नाही, तोपर्यंत कुडाळमधून दत्ता सामंत आणि सावंतवाडीतून राजन तेलींचा पाठिंबा आम्ही कायम ठेवू,” असं भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.

त्यामुळं राज्यात जरी शिवसेना-भाजप युती असली तरी सिंधुदुर्गात ‘राणे विरुद्ध शिवसेना’ हाच संघर्ष कायम राहणार असल्याचं दिसतंय.

‘राणे विरुद्ध शिवसेना’ हा संघर्ष जुना आहे. तोच पुन्हा एकदा इथं पाहायला मिळतोय. नितेश राणे यांच्या विरुद्ध शिवसेनेनं सतीश सावंत यांना उमेदवारी दिलीय. विशेष म्हणजे, सतीश सावंत हे काही दिवसांपूर्वीपर्यंत राणेंचे समर्थक होते.

राणेंविरोधात शिवसेनेनं उमेदवार दिल्यानं सिंधुदुर्गातील इतर दोन मतदारसंघात म्हणजे कुडाळ आणि सावंतवाडी इथं भाजपनं सेनेच्या विरोधातल्या उमेदवारांना पाठिंबा दिलाय.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा