शिर्डी साईमंदिराच्या छतावरील बोजा हटवला; मंदिराला धोका होऊ नये म्हणून निर्णय

11

शिर्डी, २० सप्टेंबर २०२२: साईबाबा मंदिराच्या छतावर असणारा बोजा काल हटविण्यात आलाय. गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरात हवा खेळती राहावी यासाठी एसी यंत्रणा बसवली आहे. या साठी वातानुकुलीत यंत्रणेचे साहित्य मंदिराच्या छतावर बसविण्यात आले होते.

तसच साडेपाच टनांचे आऊट डोअर आणि इतर साहित्य होते. मात्र या बोजा मुळे जुने झालेल्या मंदिराला धोका होऊ नये यासाठी मुख्य कार्यकारी आधिकारी भाग्यश्री बनायत यांनी आदेश दिल्यानंतर हे सर्व साहीत्य अन्य ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

तसेच या साहित्यसह छतावर असणारे शेकडो किलो वजनाचे साहित्य हटविण्यात आल्यामुळे मंदिराच्या छताने अता मोकळा श्वास घेतला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रकाश जगताप

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा