संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरे यांची आत्महत्या !

10

पुणे -पिंपरी ६ फेब्रुवारी २०२५: पिंपरी : संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष मोरे (वय ३०) यांनी गुरुवारी सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या शेवटच्या चिठ्ठ्यांमधून स्पष्ट झाले आहे.

शिरीष मोरे यांच्या चिठ्ठ्यांतील भावनांचा वेदनादायी कळस

शिरीष मोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आई-वडील, मित्र, होणारी पत्नी आणि कुटुंबियांसाठी चार चिठ्ठ्या लिहिल्या होत्या. या पत्रांमध्ये त्यांनी आपल्या मनातील वेदना आणि आर्थिक विवंचनेचा उल्लेख केला आहे. त्यांच्या भावना वाचून कोणाचेही मन हेलावल्याशिवाय राहणार नाही.

मित्रांसाठी शेवटचा संदेश

“प्रिय आकाश, मनिष, अक्षय, अजय आणि माझ्या सर्व मित्रांनो, मला माफ करा. मी लढाईच्या मैदानातून पळून जात आहे, हे मला माहित आहे. पण माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या. माझ्या बहिणीचे चांगल्या स्थळी लग्न लावा. माझ्यावर खूप मोठे कर्ज आहे – मुंबई सिंगवी १७ लाख, बचत गट ४ लाख, सोने तारण २.२५ लाख, गाडी ७ लाख आणि इतर ८० हजार. माझी गाडी विकून काही कर्ज फिटेल, पण…”…..या शेवटच्या शब्दांनी त्यांच्या हताश मानसिकतेची जाणीव होते. आर्थिक अडचणींनी त्यांना इतके त्रासले होते की, त्यांनी मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला.

शिरीष मोरे यांच्या आत्महत्येने समाजाला अनेक प्रश्न विचारण्यास भाग पाडले आहे. तरुणाईमध्ये वाढती आर्थिक असुरक्षितता आणि कर्जाचा वाढता भार ही चिंताजनक बाब आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ; सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा