उंडवडी कडेपठार: बारामती तालुक्यातील जिरायती भागाला वरदान ठरलेल्या शिरसाई उपसा सिंचन कालव्याला गुरुवार दि २३ रोजी दुपारी २ वाजता अवर्तन सोडण्यात आले . तसेच हे पाणी टेल टु हेड जाणार असुन सध्या ३ पंपाद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. अंजनगावला पाणी चालु असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता एल.जी.भोंग व अमोल शिंदे यांनी दिली.
सध्या जिरायती भागात ज्वारीची पिके काढणीस आलेली असुन नवीन लागण केलेल्या कांदा तसेच गव्हाचे पिकही असल्याने शिरसाईला सुटलेल्या पाण्याचा या पिकांना तर फायदा होणारच असुन उन्हाळयात जनावरांच्या चा-याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच सध्या काही ठिकाणच्या विहिरींची पाणी पातळी कमी झाली अाहे. या आवर्तनामुळे विहिरींची पाण्याची पातळी वाढेल आणि उन्हाळ्यात देखील पिकांनाही या पाण्याचा फायदा होणार आहे.सध्या अंजनगाव याठिकाणी पाणी चालु असुन शेतक-यांच्या मागणीनुसार पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिका-यांनी दिली आहे
फोटो ओळ: -उंडवडी सुपे येथील डिपकट द्वारे अंजनगाव येथे पाणी सोडण्यात आले.
काही ठिकाणी खाली गेलेली पाण्याची पातळी पुन्हा भरून येईल आणि उन्हाळ्यात जनावरांच्या चारा-पाण्याचा व ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यात मदत होईल.