शिरूर: शिरुर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय बारहाते यांची बिनविरोध निवड झाली असून समन्वयकपदी पोपट पाचंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष – संजय बारहाते, तालुका समन्वयक – पोपटराव पाचंगे,उपाध्यक्ष – प्रवीणकुमार जगताप, धनंजय गावडे, नवनाथ रणपिसे, बापू जाधव, शिरुर शहराध्यक्ष – दीपाली काळे, सरचिटणीस – श्रीहरी पर्हाड ,चिटणीस – एन.बी. मुल्ला,कोषाध्यक्ष – विठ्ठल गवळी, सहकोषाध्यक्ष – बाळासाहेब गायकवाड,कार्यकारिणी सदस्य – सतिश भाकरे, राजाराम गायकवाड, रमेश दरेकर व विठ्ठल वळसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल युनूस तांबोळी व के. डी. गव्हाणे यांचा शिरूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने गौरविण्यात आले.
या बैठकीस मराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी एम.जी.शेलार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा समन्वयक सुनिल जगताप यांनी सहाय्यक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे,जिल्हा उपाध्यक्ष सुनिल भांडवलकर, सचिव रविंद्र पाटील, कार्यकारिणी सदस्य धर्मा मैड आदि उपस्थित होते.