गोल पोस्ट महाराष्ट्र शिरूर तालुका पत्रकार संघाकडून कुटुंबांना “एक हात मदतीचा”

शिरूर तालुका पत्रकार संघाकडून कुटुंबांना “एक हात मदतीचा”

शिरूर, दि.११ मे २०२०: कोरोनामुळे सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या कामगारांचे अतोनात हाल होत आहेत. त्यांना दोन वेळची भाकरी मिळणे अवघड झाले आहे.

अशीच परिस्थिती शिरूर तालुक्यातील कासारी फाटा येथे भटकंती करीत आयुर्वेदिक औषधे विकुन पोट भरणाऱ्या सात कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या कुटुंबाना कुठल्याही प्रकारचा धंदा नाही. त्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी कोणतीही गोष्ट उपलब्ध नाही. याबाबत शिरुर तालुका पत्रकार संघाच्या वतीने या सात कुटुंबाना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांनी या कुटुंबाना स्वतः जाऊन तात्काळ मदत उपलब्ध करून दिली. त्यामुळे या कुटुंबाचा खाण्याचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते व त्यांच्या सहकाऱ्यांचे या कुटुंबियांकडून आभार मानण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

error: Content is protected !!
Exit mobile version