पुणे : राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यास दहा रुपयांत जेवन देण्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. त्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तान राज्यभरात शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला. पुण्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या टप्प्यात ११ ठिकाणी ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून या अंतर्गत दररोज ७५ ते १५० जणांना शिवभोजन थाळीचा आस्वाद घेता येणार आहे. शिवाय ही सुविधा दुपारी१२ ते २ या कालावधीतच उपलब्ध असणार आहे.
पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेतील हॉटेल निशिगंधा,
कौटुंबिक न्यायालय, कात्रज कॉर्नर येथील जेएसपीएमचे उपाहारगृह, स्वारगेट एसटी स्थानक, गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डमधील समाधान गाळा क्र.११
महात्मा फुले मंडई, हडपसरमधील गाडीतळ येथील शिवसमर्थ भोजनालय या ठिकाणी शिवभोजन थाळी खाता येणार आहे.
याशिवाय पिंपरी चिंचवडमधील पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपाहारगृह, यशवंतराव चव्हाण रुग्णालय,
वल्लभनगर बसस्थानक, पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण येथे शिवभोजन थाळी मिळेल.