जालन्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नियुक्त्या जाहीर

जालना ३ मार्च २०२४ : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जालना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी शिवसेना जिल्हा कार्यकारिणी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत लोकसभा समन्वयक राजु पाटील, उपनेते लक्ष्मण वडले, सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, माजी आमदार संतोष सांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत, शिवसेना जालना शहर व तालुक्यातील पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या
जाहीर केल्या.

जालना तालुका संघटकपदी बाबुराव कायंदे, जालना शहर संघटकपदी विजय पवार, दलित आघाडी शहरप्रमुखपदी संजय रत्नपारखे, उपशहरप्रमुखपदी मनोज गौड, डॉ. राजेश राऊत तर जालना तालुक्यातील रेवगाव विभागाच्या विभागप्रमुखपदी बळीराम ढवळे व शहरातील विभागप्रमुखपदी सखावत पठाण यांच्या नियुक्त्या झाल्या.

नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे भगवे रुमाल घालून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ यांच्यासह आजी माजी जि.प. सदस्य, पं.स.सदस्य आजी माजी लोकप्रतिनिधी,
पदाधिकारी, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा