मंठा, जालना १२ जुलै २०२४ : जालन्यातील मंठा तालुक्यातील तळणी येथे शिवसेनेच्या वतीने महिलांसाठी नोंदणी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलीय. उदयसिंह बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नोंदणीस प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी बोलतांना उदयसिंह बोराडे म्हणाले की, सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. प्रवासात सवलत, कुसुम योजनेअंतर्गत सौर पंप, मुलींना मोफत शिक्षण, महिला बचत गटांना उभारी देण्यासाठी कल्याणकारी योजना सुरु केल्यात.
आताच्या अर्थसंकल्पात शेतीपंपांचे वीज बिल माफ करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे, असे सांगून महिलांनी शिक्षणाप्रती अधिक जागृत राहावे असे आवाहन उदयसिंह बोराडे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष माऊली सरकटे, तळणी सरपंच गौतम सदावर्ते, युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेशराव गणगे, नितीन मोरे, अमोल वीरकर, पवन खरात, पवन सरोदे,पप्पू बोराडे,गजानन कांगणे, ज्ञानेश्वर येऊल, संजय राठोड, नंदू जाधव, सुनील चव्हाण,व महिला मंडळ मोठ्या संख्येने दिसत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राजकुमार कांगणे