माढा, ८ जानेवारी २०२१: कुर्डुवाडी नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांवर कोणाची निवड लागणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. बुधवार दि.६ रोजी स्थायी समिती आणि विषय समिती निवडणूक आँनलाईन पद्धतीने नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या दालनात पार पडली. सर्व विषय समित्यांवर सत्ताधारी शिवसेनेचेच वर्चस्व कायम राहिले. यावेळी झालेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार राजेश चव्हाण हे होते. त्यांना सहाय्यक म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भुमकर यांनी काम पाहिले.
विषय समिती व स्थायी समितीवर निवड झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे
१) सार्वजनिक बांधकाम नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी बबन बागल तर सदस्यपदी वनिता सातव, अनिता साळवे, निवृत्ती गोरे व आनंद टोणपे यांची निवड झाली.
२) सार्वजनिक आरोग्य, वैद्यकिय आणि महिला बाल कल्याण समिती सभापती पदी राधिका धायगुडे तर सदस्यपदी नंदा वाघमारे, जनाबाई चौधरी, आयुब मुलाणी व शांता पवार यांची निवड झाली.
३) पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापती पदी दमयंती सोनवर तर सदस्यपदी अनिता साळवे, जनाबाई चौधरी, संजय गोरे, शहनाज मुलाणी यांची निवड झाली.
४) शिक्षण समितीवर सभापती म्हणून पदसिध्द उपनगराध्यक्षा उर्मिला बागल यांची तर सदस्यपदी नंदा वाघमारे, वनिता सातव, अरुण काकडे व शांतापवार यांची निवड करण्यात आली.
५) स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्ष समीर मुलाणी तर सदस्यपदी सर्व विषय समिती सभापती अनुक्रमे उर्मिला बागल, बबन बागल, राधिका धायगुडे, दमयंती सोनवर, यांची निवड झाली.
या निवडीनंतर पिठासनाधिकारी राजेश चव्हाण यांनी सर्व नूतन सभापतींना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक धनंजय डिकोळे व प्रकाश गोरे यांचेसह आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण, भांडार विभागाचे अतुल शिंदे, अस्थापना लिपीक रवींद्र भांबूरे, समुदाय संघटक नितीन आखाडे उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील