शिवसेना सोडलेली नाही… सोडणारही नाही, बंडानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

सुरत , 22 जून 2022: कालपासून राज्यात शिवसेनेतील बंडखोरीमुळं राजकारण तापलेलं दिसत आहे. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे 33 तर अपक्ष 3 असे 36 आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा केलाय. या सर्व आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे गोहाटी ला रवाना झाले आहेत. या दरम्यान काल त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोन वर 15 मिनिटं चर्चादेखील झाली. या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदे यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

शिवसेना सोडणार नाही…

प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “मी आणि माझ्या सोबत असलेल्या आमदारांनी केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही सत्तेसाठी किंवा राजकारणासाठी फारकत घेतलेली नाही. बाळासाहेबांनी आम्हाला जे हिंदूत्व दिलं आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मांडलेली भूमिका आम्ही पुढं घेऊन जात आहोत. बाळासाहेबांनी या देशाला हिंदुत्वाचा विचार दिला आहे. यामध्ये आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. आम्ही शिवसेना सोडलेली नाही किंवा सोडणारही नाही.”

36 आमदारांची बंडखोरी, शिवसेनेचे 4 नेते सामील

गुहाटी ला उड्डाण भरलेला विमानामध्ये 36 आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये 33 आमदार शिवसेनेचे आहेत तर 3 अपक्ष आमदार आहेत. याबरोबरच अशी माहिती देखील समोर येतेय की यामध्ये शिवसेनेचे 4 नेते देखील आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा