गोल पोस्ट महाराष्ट्र रक्ताने माखलेल्या कपड्यात शिवसेनेच्या नेत्याला पोलिसांकडून अटक

रक्ताने माखलेल्या कपड्यात शिवसेनेच्या नेत्याला पोलिसांकडून अटक

कल्याण, दि.२५ मे २०२०: कल्याण येथे खिसे तपासणीवरुन वाद झाला या वादातून एका भाविकाची मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. यात अजून एक धक्कादायक बाब म्हणजे शिवसेनेचे शाखा प्रमुख यांना पोलिसांनी चक्क रक्ताने माखलेल्या कपड्यात अटक केली आहे. त्यामुळे या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मलंगगडाच्या पायथ्याशी रविवारी( दि.२४) रोजी रात्री उशिरा हा प्रकार घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मलंगगडाच्या पायथ्याशी खिसे तपासण्यावरून वाद होऊन काही जणांमध्ये हाणामारी झाली. त्यात स्थानिकांनी केलेल्या मारहाणीत एका भाविकाचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आरोपींनी घटनास्थळावरून धूम ठोकली होती. घटनस्थळावरून पोलिसांना एक मोबाईल फोन सापडला. शिवसेना शाखा प्रमुख जितेंद्र पाटील यांचा हा मोबाईल फोन असल्याचं तपासात समोर आले. पोलिसांनी जितेंद्र पाटीलला अटक केली आहे. यावेळी जितेंद्र पाटील याचे कपडे रक्तानं माखलेले होते. त्यामुळे त्यांच्यावरचा पोलिसांचा संशय आणखी बळावला आहे. पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version