नाशिक ५ नोव्हेंबर २०२३ : वसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्याबाबत गैरहजर राहिल्याप्रकरणी, मालेगाव न्यायालयाने त्यांना २ डिसेंबरला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. सदर सुनावणीस उपस्थित न राहण्याबाबत संजय राऊत यांच्या वकिलांनी मराठा आंदोलनाचे कारण देत, न्यायालयाकडे अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला आणि त्यांना जामीनपात्र वॉरंट बजावत २ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. या तारखेला हजर न राहिल्यास त्यांना पकड वॉरंट बजावण्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
दिनांक २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या पहिल्या सुनावणीच्या वेळी खा.राऊत गैरहजर होते. मालेगावचा गिरणा साखर कारखाना वाचविण्यासाठी जमा केलेल्या शेअर्समध्ये मंत्री दादा भुसे यांनी १७८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप खा. संजय राऊत यांनी दै.सामनामध्ये केला होता. मंत्री भुसे यांनी खा.राऊत यांना नोटीसद्वारे पुरावे सादर करण्यास सांगितले होते. मात्र राऊत यांनी कुठलेही पुरावे सादर न केल्याने मंत्री भुसे यांनी खा.राऊत यांच्या विरोधात मालेगाव न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला होता.
शिवसेना नेते व खा.संजय राऊत यांच्यावर मंत्री भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्यावर मालेगाव न्यायालयात झालेल्या सुनावणीला खा.राऊत पुन्हा गैरहजर राहिले. मराठा आंदोलनामुळे राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आल्याचे कारण देत वकिलांमार्फत अर्ज खा.राऊत यांनी न्यायालयात सादर केला.न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे