शिवसेना नेत्याची गोळी झाडून हत्या ;पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी

11

भोपाळ, २ सप्टेंबर २०२०: मध्य प्रदेशातील शिवसेनेच्या नेत्याची गोळी घालून हत्या करण्याची घटना घडली आहे. हत्या झालेल्या नेत्याचे नाव रमेश साहू असे आहे. तसेच या गोळीबारात रमेश साहू यांच्या पत्नीला आणि मुलीला गंभीर दुखापत झाली आहे.

इंदोर जवळील उमरी खेडा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. तसेच पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत. फरार आरोपीचा शोध सुरू आहे. इंदौरमधील तेजाजी शहर पोलीस ठाणे हद्दीत उमरीखेडा येथे शिवसेनेचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष असलेल्या रमेश साहू यांचा ढाबा आहे. या ढाब्यावरच साहू यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीये. सकाळी ढाब्यावरील कर्मचारी आत गेल्यानंतर ही घटना समोर आली.

तसेच घटना झालेल्या स्थळी पोलिसांनी पाहणी केली आहे. तसेच ही हत्या पूर्व वैमनस्यातून झाली असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मृतदेह शविच्छेदनाला पाठवून चौकशी सुरू केली आहे. तसेच आरोपीने हत्या करून कुठली ही वस्तू चोरी केलेली नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे