गोल पोस्ट महाराष्ट्र नाशिक शिवसेनेच्या खासदाराला कोरोनाची लागण

शिवसेनेच्या खासदाराला कोरोनाची लागण

नाशिक,  १ सप्टेंबर २०२०: कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यातच आज शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच ही माहिती त्यांनी आपल्या ट्विटरवरून शेअर करून सांगितली आहे. ते म्हणाले,” माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी आणि सहकाऱ्यांनी काळजी म्हणून वैद्यकीय सल्ल्याने आवश्यकता असल्यास स्वतःची कोव्हिड -१९ चाचणी करून घ्यावी,” असं आवाहन हेमंत गोडसे यांनी केलं आहे.
तसेच पुढे ते म्हणाले, मी माझ्या ठिकाणाहून आपली कार्य आणि सेवा सुरू  ठेवणार आणि कोरोना परिस्थितीचा आढावा घेत राहील. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, असे हेमंत गोडसे म्हणाले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या जिल्ह्याचा कोरोनाचा आलेख वाढत असताना मतदारसंघातील विकास कामे, शासकीय बैठका तसेच मतदारसंघातील विविध ठिकाणी भेटी देणं गरजेचं असल्याने माझं काम सुरु होतं, अशी माहिती गोडसेंनी दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे
error: Content is protected !!
Exit mobile version