शिवसेनेकडून व्यंकय्या नायडूंचा निषेध, लोणी काळभोर येथे नाराजी व्यक्त

7

लोणी काळभोर, दि. २४ जुलै २०२०: राज्यसभेचे सभासद व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीवेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा पुणे जिल्हा शिवसेनेचे वतीने जाहीर निषेध करून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यसभा खासदारकीची शपथ घेताना शपथ संपल्यावर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी जय भवानी, जय शिवाजी, अशी घोषणा दिली होती, यावरून राज्यसभेचे सभापती नायडू यांनी उदयनराजेंना समज दिली यावरुन शिवसैनिकांमध्ये नायडू यांच्या विरोधात नाराजीचे वातावरण पसरले आहे.

या निषेधार्थ आज पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांनी माजी खासदार व उपनेते संपर्कप्रमुख शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाप्रमुख माऊली कटके, रमेश कोंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार संजय भोसले यांना निवेदन दिले यावेळी जिल्हा संघटक रमेश भोसले, हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, संदीप मोडक, लोणी काळभोर शाखाप्रमुख राहुल काळभोर, विभाग प्रमुख राजेंद्र जोशी, शांताराम पडवळ, पोपट चोरगे, यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा