गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा शिवसेनेचं पेट्रोल, डिझेल दर वाढीच्या विरोधात आंदोलन

शिवसेनेचं पेट्रोल, डिझेल दर वाढीच्या विरोधात आंदोलन

बारामती, १२ डिसेंबर २०२०: शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसैनिकांना दिलेल्या आदेशानुसार आज बारामतीमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात अॅड. राजेंद्र काळे यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलनं करण्यात आली.

बारामती तालुका व शहर शिवसैनिकांनी भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभा जवळ इंधन दरवाढीच्या विरोधात व शेतकरी आंदोलन बाबत आक्षेपार्ह शब्द वापरणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यात आलं. तसेच केंद्रातील भाजप सरकार व रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख अॅड. राजेंद्र काळे असे म्हणाले की, वाढलेल्या इंधनवाढीचा सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष विश्वास मांढरे शहर प्रमुख पप्पू माने, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार धनंजय जाधव यांना निवेदन देण्यात आलं.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

error: Content is protected !!
Exit mobile version