मुंबई, ५ सप्टेंबर, २०२२ : अमित शाह यांचा दौरा जसा सुरु झाला तसं, शिवसेनेची चळवळ वाढली. त्यात अमित शाहा यांनी यावेळी तीव्र शब्दात शिवसेनेवर हल्लाबोल केला. पण शिवसेनेनं यावर पलटवार करायला सुरुवात केली आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने भाजपवर वार करत आहे. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं की, आम्हाला भाजप काय जमिनीवर आणणार. आम्ही तर मुळातच जमिनीवर आहोत. जे आकाशात आहेत, त्यांना आम्ही जमिनीवर आणत आहोत. असे म्हणत भाजपवर टीका केली.
नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं की, योग्य वेळ आली की आम्ही शिवसेनेची ताकद दाखवू. शिवसेना कायम सक्षम आहे आणि राहिल.
शिवसेन नेते चंद्रकांत खैरे यांनी अमित शाह यांना थेट आव्हान दिलंय. अमित शाह संपूर्ण सुरक्षा, कडेकोट बंदोबस्तात मुंबईत येऊन बोलत आहे. त्यांनी एकट्यानी येऊन बोलून दाखवावं. मुंबईचे शिवसैनिक साधे वाटतात का ? असे म्हणत त्यांनी भाजपला प्रतिउत्तर दिलं.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी देशातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्याला मुंबईत यावं लागतं, यातच सारं काही आलं. यातच शिवसेनेचा विजय झाला आहे. असं म्हणत अंबादास दानवे यांनी अमित शाह यांना टोला लगावला.
दिल्ली- पंजाबसरखं मुंबईतही भाजप भुईसपाट होईल. भाजपने शिवसेनेच्या उपकाराची जाण ठेवावी. मुंबई महानगर पालिकेवर भगवा शिवसेनेचाच फडकणार, असं अरविंद सावंत यांनी अमित शाह यांच्या वक्तव्यावर सांगितंलं.
भाजप विरुद्ध शिवसेना हा वाद जास्तच चिघळला आहे. त्यात अमित शाह यांनी या दौ-यात वापरलेल्या भाषेमुळे शिवसेना चिथावली गेली आहे. शिवसेना आणि भाजप तसेच शिंदे-फडणवीस गट या सगळ्यांसाठी मुंबई पालिका आता महत्त्वाची आणि मानाची आहे, हे तर उघडच आहे. पण अमित शाह यांचे “मिशन १५०” यशस्वी होतं का? हे पहाणं गरजेच आहे. पण यात चित कोणाची आणि पट कोणाचा हे मात्र पाहणं, गरजेचं आहेच. पण त्यावरुन राजकारणातला खरा वजीर समोर येईलं, हे मात्र खरं.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस