कांदा निर्यात धोरणाचा निषेध करण्यासाठी खेड तालुक्यात शिवसेनेच्या निषेध आंदोलन

राजगुरूनगर, १६ सप्टेंबर २०२० ; केंद्र सरकारने तात्काळ कांदा निर्यात बंदी उठवून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा या मागणीसाठी व केंद्राच्या निर्यात धोरणाचा निषेध करण्यासाठी आज पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकार विरोधी घोषणाही देण्यात आल्या. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे जिल्हा सल्लागार प्रकाश वाडेकर, महिला संपर्कप्रमुख विजयाताई शिंदे, शहर प्रमुख दिलीप तापकीर, खेड पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे, उपसभापती ज्योती आरगडे, जिल्हापरिषदेच्या तनुजा घनवट, माजी उपसभापती भगवान पोखरकर, पंचायत समिती सदस्य सुनिता सांडभोर, वैशाली जाधव यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

निर्यात बंदी तात्काळ न उठविल्यास शिवसेनेच्या वतीने पुढील काळात अधिक उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी दिला. कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. लॉकडाउनच्या कालावधीत अनेक शेतकऱ्यांचा संपूर्ण शेतमाल खराब झाला.

त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढला आहे. दूध व इतर मालाचे भाव पडले असताना बहुतांशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सध्या थोड्याफार प्रमाणात शेतमालाची बाजारपेठ सुरू झाली असताना कांदाचाळीत साठवलेला कांदा विक्रीसाठी बाहेर काढला आहे.

परंतु, अचानक केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी लावण्यात आली. चांगला बाजारभाव मिळू लागल्याने कांदा केंद्राच्या निर्यातबंदीमुळे कवडीमोल भावाने शेतकऱ्यांना कांदा विकावा लागत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: सुनील ठिगळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा