रायगडच्या खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाची बाजी, सर्वाधिक सहा जागांवर सरपंच आले निवडून

18

खालापुर, रायगड ७ नोव्हेंबर २०२३ : रायगडच्या खालापुरात २२ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. त्यामध्ये शिंदे गटाने सरपंच पदाच्या सर्वात जास्त जागी विजयी होण्याचा मान मिळविला, यामध्ये शिवसेना शिंदे गटाला सहा अजित पवार राष्ट्रवादी गटाला पाच, काँग्रेसला एक, स्थानिक आघाडी एक, शिवसेना उद्धव ठाकरे गट चार, महाविकास आघाडी दोन तर भारतीय जनता पार्टी चार अशी सत्ता स्थापन झाली आहे.

खालापूर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीचा निवडणुका काल पार पडल्या असून आज त्यांचा निकाल जाहीर झाला या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली असून सर्वाधिक सहा जागांवर थेट सरपंच पदी आपले उमेदवार निवडून आणले आहेत. त्यापैकी नारंगी, चिलठन, नंदनपाडा, जांभिवली, मानकिवली व आत्करगाव येथे शेकाप व शिंदे गट मिळून अशा सहा जागा शिंदे गटाने आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत.

ठाणेन्हावे, कुंभिवली सावरोली, बीडखुर्द, वासांबे या ग्रामपंचायतींवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी चा झेंडा फडकला आहे, इतर काँग्रेसकडे चांभार्ली ही ग्रामपंचायत संपूर्ण पॅनल सह घेता आली,तर बोरगाव,वरोसे, या भाजप कडे राहिल्या असून इसांबे येथे भाजप व शिवसेना अशी युती होती, तर खानाव येथे स्थानिक आघाडी ने सरपंच पद घेतले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : दत्तात्रय शेडगे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा