मणिपूर घटनेच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने फलटण येथे तहसीलदारांना निवेदन

फलटण, सातारा २७ जुलै २०२३ : मणिपूर येथे महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या मागणीचे निवेदन फलटण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने, फलटण येथे तहसीलदार यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी तहसीलदार कार्यालयाच्या समोरच शिवसैनिकांनी प्रचंड मोठी घोषणाबाजी केली.

निवेदनाच्या माध्यमातुन मणिपूर येथे घडलेल्या महिलांवरील अत्याचाराचा, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला. मणिपूरमध्ये स्त्रियांवरील अमानुष अत्याचाराची घटना तसेच त्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्तींची निर्घुण हत्या या सर्व घटनांकडे मणिपूर राज्य शासन व केंद्र शासन दुर्लक्ष करत आहे. दोन्हीही सरकारांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल दोन्ही शासनाचा व भाजपचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला.

संबंधित आरोपींना कडक शासन व्हावे या मागणीचे निवेदन फलटण तहसीलदारांना देण्यात आले. निवेदनावर फलटण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. हे निवेदन देताना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा