मुंबई, २८ जुलै २०२०: शशिकांत चव्हाण हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे पण शिवसेनेचा गड सोडून त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले होते आणि आता त्यांनी पुन्हा हाती शिवबंधन बांधले आहे. माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत चव्हाण यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आहे.
रामदास कदम यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत परतले. त्यामुळे शिवसेनेची ताकद पुन्हा वाढल्याचे बोलले जात आहे. शशिकांत चव्हाण यांच्या खांद्यावर लवकरच मोठी जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
शिवसेेनेेत शशिकांत चव्हाण याच्या परतीमुळे शिवसेना पक्षाची कट्टरत्ता पुन्हा एकदा वाढली असून पक्ष भक्कमपणे बांधणीला याचा फायदा होईल आसे दिसत आहे. तर भाजपातील अनेक नेत्यांच्या नाराजीचे वेळोवेळी नेत्यांकडून स्वत:हून दाखले देताना दिसले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी