खतरों के खिलाडी १३’ मधून शिव ठाकरे बाहेर, ऐश्वर्या शर्माकडे गेली टास्क

मुंबई, १४ ऑगस्ट २०२३ : रोहित शेट्टीच्या स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाड़ी १३’ च्या चौथ्या आठवड्यात आणखी एका स्पर्धकाला शोमधून बाहेर काढण्यात आले. तो दुसरा कोणी नसून ‘बिग बॉस मराठी २’ चा विजेता आणि ‘बिग बॉस १६’ चा फर्स्ट रनर अप शिव ठाकरे आहे. त्याला हा शो सोडावा लागला.

तर शिव ठाकरे याला या आठवडय़ात एलिमिनेशनला सामोरे जावे लागले. त्याच वेळी, या आठवड्यात एका स्पर्धकाची वाईल्ड कार्ड एन्ट्री देखील झाली आहे. या आठवड्याच्या शोचा होस्ट रोहित शेट्टी स्वतः टास्कमध्ये स्पर्धकांसमोर दिसला. शेवटच्या एपिसोडमध्ये रोहित शेट्टीने स्पर्धकांना ‘रोहित विरुद्ध खिलाडी’ चा बोर्ड दाखवला आणि सांगितले की ज्याच्याकडे जास्त स्टार असतील तो टास्क जिंकेल. जर संघ जिंकला तर कोणाचेही एलिमिनेशन होणार नाही. पण जर तो स्वतः हा टास्क जिंकला तर कोणाला तरी शोमधून बाहेर जावे लागेल.

टास्क सुरू झाला ज्यामध्ये रोहित शेट्टीने प्रथम दोन स्टार्ससह त्याचे खाते उघडले, नंतर शेवटी रोहित शेट्टीला ६ स्टार मिळाले तर स्पर्धकांना फक्त ५ स्टार मिळाले. एलिमिनेशन राऊंडमध्ये शिव ठाकरे आणि ऐश्वर्या शर्मा यांची नावे समोर आली आहेत. त्यानंतर त्याला धोकादायक स्टंट देण्यात आला. तो धोकादायक स्टंट म्हणजे शिव आणि ऐश्वर्याला साप-विंचूच्या मधोमध चावी काढून विद्युत प्रवाहाचे धक्के बसत साखळीतील कुलूप उघडावे लागले.

जिथे ऐश्वर्याने हे टास्क १० मिनिटे ३ सेकंदात पूर्ण केले. तर शिव ठाकरेंनी ११ मिनिटे ४६ सेकंद घेतले. त्यामुळे ऐश्वर्या शर्मा या टास्कची विजेती ठरली आणि शिव ठाकरेला शोमधून बाहेर जावे लागले. त्याचवेळी ‘खतरों के खिलाड़ी १३’ या शोमध्ये अंजुम फकीहची वाईल्ड कार्ड एन्ट्रीही झाली होती. शिव ठाकरेच्या आधी रुही चतुर्वेदी आणि अंजली आनंद यांना शो सोडावा लागला होता तर रोहित रॉयला दुखापतीमुळे शोमधून बाहेर पडावे लागले होते.

शोमधून शिव ठाकरेची एक्झिट आणि अंजुम फकीहची शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतर आता शोमध्ये फक्त १० स्पर्धक उरले आहेत. ज्यामध्ये ऐश्वर्या शर्मा, अंजुम फकीह, डेजी शाह, शीजान खान, अर्चना गौतम, अरिजित तनेजा, दिनो जेम्स, नायरा बॅनर्जी, सौंदस मौफकीर आणि रश्मीत कौर.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा