अहमदनगर : क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ हा सर्वोच्च पुरस्कार समजला जातो.
या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन शासनाने शिवजयंती दिनीच म्हणजे (१९ फेब्रुवारी) रोजी करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे क्रीडा मंत्री सुनील केदार व राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे नगर विकास मंचाचे निमंत्रक किरण काळे यांनी केली आहे.
पूर्वी तत्कालीन आमदार आणि जेष्ठ नेते प्रसाद तनपुरे यांनी याबाबत तत्कालीन क्रीडा मंत्री स्व.रामकृष्ण मोरे यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. त्याला शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत शिवजयंती दिनी आयोजन देखील केले होते.
मात्र ही परंपरा पुन्हा विखंडीत झाली. ती यावर्षी पासून पुन्हा सुरु करण्यात यावी. यासाठी या खात्याचे मंत्री म्हणून दोन्ही मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे काळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, भाजपकडून देशात छत्रपती शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदींची तुलना करण्याचा किळसवाना प्रकार सुरु आहे. भाजपच्या या विकृत मनोवृत्तीचा निषेध किरण काळे यांनी आपल्या पत्रकात केला आहे.