शिवजयंती आणि राज्य सरकारची भूमिका – पैगंबर शेख

शिवजयंती बाबत राज्य सरकारची भूमिका अजिबात पचनी पडली नाही. महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी आंदोलने होत आहेत, राजकीय सभा होत आहेत. या सर्वांचा विचार करता मिरवणुका न काढण्याचे आदेश देत सभा आणि व्याख्याने ठेवण्याचे आणि सामाजिक उपक्रम घेण्यास परवानगी देण्यास काहीच हरकत न्हवती…

दुसरी गोष्ट राज्यात आधीपासूनच जमावबंदी लागू आहे. पाच पेक्षा जास्त लोक जमणे कायदेशीर गुन्हाच आहे. पण सगळं काही पोलीस प्रशासनाच्या एडजस्टमेंट वर चाललंय. आणि हे सर्वकाही ते तुमच्यासाठी आणि तुमच्या सोयीकरताच करत आहेत हेही लक्षात राहुद्यात. किल्ल्यावर देखील गर्दी करण्यास आधीपासूनच निर्बंध आहेत. एवढंच काय तर बरीच मोठमोठी उद्याने आणि बागा या अजूनही चालू केल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे या विषयाचे राजकीय भांडवल न करता मध्यम मार्ग काढणे उत्तम. कोरोनामुळे सण साजरे करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. मागील वेळी शिवजयंतीला मीही पुण्यात स्वराज्य रथाच्या स्वागत कार्यक्रमात सामील होतो यंदा ते शक्य नाही. पण यंदा मी शिवजयंतीला रक्तदान करून माझे महाराष्ट्रासाठी छोटेसे योगदान देणार आहे.

शेवटी शिवराय सर्वांचेच आहेत. आणि कोरोनाची काळजी घेत त्यांची जयंती साजरी व्हायलाच हवी.  आणि ती आपले सामाजिक उपक्रम आणि समजउपयोगी कार्यातून होऊ शकते. समजलं तर ठीक…

– पैगंबर शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा