बदनापूर, २१ फेब्रुवारी २०२४ : समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील शिवजयंतीनिमित्त कीर्तनकार शीतल साबळे यांच्या शिव कीर्तनाचा कार्यकम २० फेब्रुवारी रोजी पाथ्रीकर कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला होता. निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर हे दरवर्षी शिवजयंतीनिमित्त बदनापूर येथील पाथ्रीकर कॅम्पसमध्ये थोर विचारवंत, कीर्तनकार आदींचे कार्यक्रम आयोजित करतात. त्यानुषंगाने यावर्षीही शिवकिर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवेश पाथ्रीकर यांच्या सह संस्थेतील सर्व कर्मचारी आणि बदनापूर शहरासह तालुक्यातील भाविक भक्तांनी या भव्य कीर्तन श्रवण करून लाभ घेतला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : आदिल खान